जर तुम्ही पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु ल) यांचा "मुम्बईकर, पुणेकर, नागपुरकर" हा लेख ऐकला किंवा वाचला नसेल तर कदाचित तुम्हाला मी या पुढे जे सांगणार आहे ते समजायला थोड़े कठिण जाईल, कदाचित त्या मागच्या ज्या भावना आहेत त्यां बद्दल गैरसमाज देखील होऊ शकेल आणि मुख्य म्हणजे गंमत येणार नाही. म्हणून वरील दिलेल्या URL वर हा लेख जरूर ऐकावा ही विनंती...
मी मुम्बईत जन्म घेऊन सुध्दा कधी मुम्बईकर होउच शकलो नाही. मुम्बईकर होण्यासाठी लागणार्या काही basic गोष्टीच माझ्याकडे देवाने दिल्या नाहीत. घाम, डास आणि गर्दी यांपैकी दोन गोष्टी शारीरिक कारणांनी तर एक मानसिक कारणाने मला चालत नाहीत. घामाची तसेच डास चावून होणारी alergy आणि भयानक गर्दी जी आपल्या कोणालाच आवडत नाही याला कारणीभूत. मुम्बईचे नागारिकत्व घेणे हा ऐच्छिक विषय असल्या कारणाने मी तो ओप्शन ला सोडला होता. पण काही गोष्टींमधे अगदी पक्का मुम्बईकर आहे मी, नाही असे नाही. जसे शहराबद्दल कोणत्याही प्रकारचा अभिमान वगैरे नसणे आणि अर्थातच मुम्बईचे एकमेव प्रेम!
खरं म्हणजे मुम्बईला आताच्या स्थितित न्यायला आपणच (मराठी माणूस) जवाबदार आहोत म्हणून बाहेरहून आलेल्यांना काय दोष देणार... जर सर्व सुरळीत असेल तर मुम्बई सारखे खरंच शहर नाही... पण काही कारणास्ताव मी आणि मुम्बई 'क्लिक' झालो नाहीत. त्यामुळे ज्यांना मुम्बई आवडते त्यांच्या बद्दल मला काहीच तक्रार नाही कारण मूलतः दोष माझ्यात आहे.
आता पुण्याच्या नागारिकत्वासाठी apply करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल थोड़े सांगू दे. आता पुण्यात मी तीन वर्ष राहातोय. माझ्या qualification बद्दल थोड़े. प्रथम म्हणजे माझ्या भाषेबद्दल तुम्हाला माहिताच असेल... उपरोधात्मक म्हण्जेच sarcastically बोलण्यात मला खास रुची आहे... याचा वापर मी माझे शस्त्र म्हणून करतो. खाजगीत आणि व्यावहारात वापरण्यात येणार्या भाषेत असलेला फरक पण माझ्या मित्रांना चांगलाच माहीत आहे. ईतारांची चेष्टा करण्यात, ह्युमरच्या मदतीने योग्यतो समाचार घेण्यात वगैरे जरी मी ठीक-ठाक असलो तरी पुण्याचे नागारिकत्व मिळविण्यासाठी मला भाषेवर अधिक प्रभुत्व लागणार आहे.
मला विचित्र गोष्टींचा जाज्वल्य अभिमान आहे. आता हेच बघा ना हल्ली लोकांना आपण मराठी आहोत हे सांगायला देखील कमीपणा वाटतो आणि मी चक्क ब्लॉग लिहितोय! माझ्या इमेजचे काय...!!!
मला मतभेद व्यक्त करण्यात तितकासा interest नसला तरी skill शिकायला आवडेल... Hereditarily आम्ही चांगल्यापैकी मतभेद व्यक्त करू शकतो आणि evolution च्या सिद्धांताप्रमाणे मी यात अधिक निपुण असलो पाहिजे...
हल्ली मी "पुर्वीचे पुणे राहिले नाही" हे वाक्य देखील म्हणायला लागलो आहे. पण खरच पुणे हल्ली बरच बदलले आहे... पुणेकरांचा तर असा आरोप आहे कि 'आयटी' वाल्यांनी पुणे बिघडवले आहे. पुण्यातले काही भाग अजूनही जुना 'वारसा' जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते काही फार वर्ष राहील असे मला वाटत नाही. पुणे जरी आता कॉस्मोपोलिटन होत असले तरी पण पुण्यात मराठी माणूस नेहेमीच असणार हे मात्र नक्की.
पुण्याचे नागरिक होणे ही काही सोपी गोष्ट नाही आणि आता तर सुरुवात आहे. माझ्या अनेक निकटवर्तियांना मी नागरिकत्व बदलत आहे हे ऐकून धक्का/दुःख होईल पण कमीतकमी मी इतर धेंडांसारखा दूसर्या देशांची हिरवी कार्ड तरी घेत नाही आहे ना!
चीयर्स!